माझ्या चाळीची गोष्ट
माझ्या चाळीची गोष्ट
बुधवार, १४ मे, २०२५
कृतज्ञता
महाविद्यालयीन
शिक्षणाच्या माझ्या या संपूर्ण प्रवासात समाजाने
विविध संस्थांच्या माध्यमातून मला खूप मदत केली. त्यामुळेच मी इंजिनिअर बनू शकलो
आणि माझं पुढचं आयुष्य सुखात घालवू शकलो. समाज तुम्हाला मदत करायला सदैव तयार
असतो. तुम्ही समाजापर्यंत स्वतःहून पोहोचता का? प्रयत्न करता का? हे महत्त्वाचं आहे. भारतीय समाज दानशूर आहे. फक्त तो
आपले दान 'सत्पात्री' असावे याची दक्षता घेतो. आणि हे दान घेता घेता 'अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशील दो कराने' अशी स्थिती माझ्या
सारख्याची होऊन
जाते.
समाज
जेव्हा आपल्याला देतो तेव्हा 'देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याने, देणाऱ्याचे हात घ्यावे' या कवितेत दिलेला संदेश आपण पाळला तर काही
वर्षातच घेणाऱ्या हातांपेक्षा देणाऱ्या हातांची संख्या कैक पटीने वाढेल यात माझ्या
मनात शंका नाही.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा